राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर केंद्र जालना यांच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चासत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विविध शिक्षकांनी त्यांच्या उपक्रमाचे सादरीकरण केले. वैविध उपक्रमाचे उदाहरण सर्व शिक्षक बंधू-भगिनी समोर ठेवण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये विशेषतः मा. निलेश जोशी, श्रीधर कुलकर्णी, सचिन खिल्लारे, मा. सविता ताई बरांडवाल, मा. नीमजे सर यांनी आपले उपक्रम सर्वांसमोर मांडले व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातले घटक व त्याचा आपण कसा अवलंब करत आहोत हे दाखवून दिले.

आजच्या या चर्चासत्राच्या वेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरचे शैक्षणिक भारुड ज्ञानेश्वर झगरे गुरुजी व त्यांच्या मंडळी मार्फत सादर करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक प्रा. संजय येवते सरांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्याचे विविध घटक सर्वांसमोर ठेवून त्याचे महत्त्व निदर्शनास आणून दिले. शिक्षण विकास मंचच्या मुख्य सल्लागार मा. बसंती रॉय यांनी उपस्थित शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हा समन्वयक रंजीत बायस, सूत्र संचालन भास्कर शिंदे व आभार शिक्षण समन्वयक मा. जगदीश कुडे यांनी केले.

या चर्चासत्रचे उद्घाटन मा. मनिषा ताई टोपे यांच्या शुभहस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या चेअरमन मा. साधनाताई गिरे व ज्ञानज्योत शिक्षण संस्थेच्या सचिव मंजुषा ठाकूर होत्या. यावेळेस प्रतिभाताई श्रीपत मॅडम, प्रा. संजय येवते सर, गटशिक्षणाधिकारी मा. रवी जोशी सर, गटशिक्षणाधिकारी भारत वानखेडे सर व डायटचे प्रा. दराडे सर, मा. मंगेश जैवल सर यांची प्रमुख होती.

यशवंतराव चव्हाण डिजिटल मीडिया