यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून राज्यभरात युवांसाठी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमासह विविध महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण विकसित होवून, व्यक्तिमत्वाच्या जडण घडणीस पोषक वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सदर प्रयत्नांचा एक भाग म्हणजे “ यशवंत शब्द गौरव आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा " होय.

‘वक्ता दशसहस्रेषु’ असे म्हणतात. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी ,व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व कला आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाधिक वक्ते निर्माण होवून, विविध विषयांवर सखोल वाचन आणि विचार मंथन व्हावे आणि सद्विचारांचा ओघ अखंड रहावा, ही अपेक्षा या माध्यमातून आहे.