शिक्षणाला नवा आयाम देण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्या माध्यमातून दोन दशकाहून अधिक काळ शिक्षणक्षेत्रात काम करत आहे. विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी अध्यापन पद्धतीमध्ये बदल करून नवीन उपक्रम राबवले तर ते परिणामकारक ठरल्याचे दिसून आले. ज्या शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला तसेच विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून थेट समाजाचे अनुभव दिले, ते देताना वेगवेगळ्या माध्यमांचाही उपयोग केला, अशा शिक्षकांच्या नवोपक्रमांची ओळख करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरने ‘नवोपक्रमांची नवलनगरी’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा चौदाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ‘डिजिटिकल वर्क्स' या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

राज्याचे माजी शिक्षण संचालक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे हे या पुस्तकाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. शिक्षण विकास मंचच्या कोअर कमिटीचे सदस्य तथा राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष महेंद्र गणपुले आणि मेंदू व शिक्षण अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांच्या अनुभवी संकलनातून हे पुस्तक साकारले आहे.

पारंपरिक शिक्षणाचा कित्ता पुढे गिरवत न्यायचा, की आजच्या काळातल्या विद्यार्थ्यांसमोर असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी शिकवण्यात बदल करायचा, हा निर्णय अनेक शिक्षक घेत असतात. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ मध्ये अशा नवोपक्रमांच्या उपयोगाचा उल्लेख करण्यात आला आहे.

‘नवोपक्रमांची नवलनगरी’मध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असलेले शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणारे तज्ज्ञ यांच्यासह जिज्ञासू वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

नवोपक्रमांची नवलनगरी तुमच्या शाळेतही घडायला हवी; यासाठी प्रत्येक पालकाने, शिक्षकाने आणि वाचकांनी जरूर घ्यावे.

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी https://chavancentre.org/books लिंकवर क्लिक करावे.

प्रकाशनप्रसंगी सवलतीच्या दरात उपलब्ध…!

संपर्क : ९०७५४९६९७७