यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या “देशोदेशीचे शालेय शिक्षण” या पुस्तकाचा परीक्षणात्मक लेख ‘जीवन शिक्षण’ या मासिकामध्ये प्रकाशित झाला. मा. अजय काळे यांनी हा लेख लिहिला आहे.

‘जीवन शिक्षण’ हे प्राथमिक शिक्षणाचे मुखपत्र आहे. SCERT पुणे, महाराष्ट्र शासनामार्फत हे मासिक प्रकाशित केले जाते.

भारतासह पाच खंडांतील २१ देशांच्या शालेय शिक्षणाची माहिती देणारे या विषयावरचे "देशोदेशीचे शालेय शिक्षण" हे मराठीतील पहिलेच सविस्तर पुस्तक आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे, धनवंती हर्डीकर यांच्यासह २१ देशांतील इतर तज्ज्ञांच्या लेखणीतून साकारलेले हे पुस्तक आहे.

आधुनिक शैक्षणिक संदर्भ, भरपूर डेटा, लेखकांचे अनुभव आणि त्याचे विश्लेषण असा समृद्ध आशयाचे उत्कृष्ट पुस्तक आहे.