महाराष्ट्रामध्ये अनेक युवा आपल्या नवनव्या उपक्रमाच्या माध्यमातून यशस्वीपणे आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. आपल्या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात आपला आदर्श निर्माण करणाऱ्या युवा व्यक्तींचा गौरव व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

नव्या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एक युवक व एक युवती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.