भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात यावे असा निर्णय केंद्र शासनाने २००८ मध्ये घेतला. यानुसार राष्ट्रीय शिक्षण दिनाचे आयोजन करणारी यशवंतराव चव्हाण सेंटर ही देशातील पहिली संस्था आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी राष्ट्रीय परिषदा घेतल्या जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये प्रत्यक्षात शिक्षण परिषद घेणे शक्य झाले नाही. तथापि ऑंनलाइन पद्धतीने ‘देशोदेशीचे शिक्षण’ आणि इतर विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच ‘१०० दिवसात १० वी’ या दहाव्या शिक्षण परिषदेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. शिक्षण विकास मंचने आजअखेर विविध विषयांवर अकरा वार्षिक शिक्षण परिषदा आयोजित केल्या आहेत.

क्रमांक वर्ष परिषदांचे विषय
१.२००८सर्वांगीण गुणवत्ता कार्यक्रम
२.२००९शिक्षण हक्क कायदा, २००९
३.२०१०शाळांची परिणामकारकता
४.२०११शालेय अभ्यासक्रमात उत्पादक कौशल्य विकास
५.२०१२शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्तनसंहिता
६.२०१३शालेय शिक्षणात माहिती व तंत्रज्ञान
७.२०१४सरकारी आणि अनुदानित शाळांपुढील आव्हाने
८.२०१५शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता
९.२०१७सेमी- इंग्रजी : काल आज आणि उद्या
१०.२०१८शालेय शिक्षण : आज आणि उद्या
११.२०१९शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती
१२.२०२२द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण