दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याजवळ दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड असणे आवश्यक आहे. ते त्यांना सहज उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने शिबिरांचे आयोजन करण्यात येतात. अधिकाधिक गरजू व्यक्तींना या योजनेचा फायदा होण्यासाठी, हा कार्यक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात यायला हवा. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना चव्हाण सेंटरच्या वतीने शासनाला देण्यात आल्या होत्या.