छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी या पाच महापुरुषांचे विचार नवीन पिढीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोहोचवण्यासाठी परिवर्तनाचे शिल्पकार या ऑडियो पॉडकास्ट सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रत्येक महापुरुषांच्या विचारांवर आधारित १० पॉडकास्ट एपिसोड तयार करण्यात येणार आहेत. हे सर्व एपिसोड चव्हाण सेंटरच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, तसेच सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही हे एपिसोड ऐकू शकता.