दिव्यांग व्यक्तींच्या विविध समस्यांवर संवाद व समन्वयाच्या भूमिकेतून मात करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून 2006 साली ‘दिव्यांग हक्क विकास मंचा’ची स्थापना झाली. श्री विजय कान्हेकर हे याचे संयोजक आहेत. या मंचाच्या वतीने दिव्यांग व्यक्ती, पालक संघटना, या क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती यांच्यासोबत चर्चा करून विविध विषयांवर कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यासोबतच शासनाच्या दिव्यांग व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृतीशील प्रयत्न केले जातात. दिव्यांगांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कल्याणकारी योजना, कायदे व सोयी सवलती याविषयांची जनजागृती कार्यक्रम केले जातात. याशिवाय दिव्यांगांसह आरोग्य क्षेत्र आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी देखील काम केले जाते. या क्षेत्राशी संबंधित शासननिर्णय, समस्या, उपाययोजना याबाबत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्य शासनाकडे, केंद्रशासनाकडे नियमित पाठपुरावा देखील केला जातो.

कार्यक्षेत्र समन्वयक

दीपिका शेरखाने- व्हटकर

कार्य क्षेत्र : 

आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक