दिव्यांग हक्क विकास मंचाच्या वतीने दिव्यांग व्यक्ती, पालक संघटना आणि या क्षेत्रात कार्य करणारे तज्ज्ञ व्यक्ती यांच्याशी एकत्रित नियमित चर्चा करून विविध विषयांवर कार्यशाळेचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ सोप्या पद्धतीने मिळावा आणि दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंचाच्या वतीने कृतीशील प्रयत्न केले जातात. दिव्यांगांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कल्याणकारी योजना, कायदे व सोयी सवलती यांविषयी जनजागृती कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.