युवांच्या विकासाकरीता महाराष्ट्र राज्याने आपले सर्वंकष युवा धोरण जाहीर करावे, यासाठी २००८ पासून नवमहाराष्ट्र युवा अभियानने राज्यव्यापी प्रक्रीया सुरु केली. अनेक युवा संघटना, विद्यार्थी संघटना, युवांच्या विषयांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांना सोबत घेऊन युवा धोरणाकरीता एक राज्यव्यापी आघाडी उघडण्यात आली. राज्य शासनाने २०१२ साली आपले युवा धोरण जाहीर केले. त्यानंतर देखील या युवा धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियान सतत प्रयत्नशील आहे.