एकल महिलांच्या (विधवा, घटस्फोटीत, वेगळ्या झालेल्या, अविवाहित) सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर चव्हाण सेंटरच्या वतीने काम केले जाते. या कार्यक्रमांतर्गत एकल महिलांच्या कायदेविषयक आणि अधिकारांच्या प्रश्नांबाबत त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाते. तालुका पातळीवरही एकल महिलांना त्यांच्या प्रश्नांबाबत कार्य करण्यासाठी ‘सपोर्ट नेटवर्क’ तयार करण्याचा प्रयत्न चालू आहेत.