केंद्र शासनाच्या नॅशनल ट्रस्ट मार्फत बौद्धिक असक्षम, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, बहुविकलांग दिव्यांगांसाठी निरामय आरोग्य विमा योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना व्हावा, यासाठी चव्हाण सेंटरच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे.