राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY - वर्ष २०१७ पासून)

देशातील गरजू जेष्ठ नागरिकांना मदत पोहोचविण्यासाठी भारत सरकारने २०१७ पासून ही योजना सुरु केली. देशातील आर्थिक दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना मदत पोहोचविणे हा संबंधित राष्ट्रीय योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत चव्हाण सेंटरच्या माध्यमातून या योजनेचा १६,००० ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये या उपक्रमात ५० हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ देण्याचे ठरविले आहे.

आरोग्य, दिव्यांग, व ज्येष्ठ नागरिक यांचे संबंधित शासननिर्णय, समस्या,योजना याबाबत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्य शासनाकडे, केंद्रशासनाकडे पाठपुरावा केला जातो.