जगभरात दि.१० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजकाल धावपळीच्या युगात माणसाचे दैनंदिन जीवन फारच त्रासदायक झाले आहे. तो शारीरिक, मानसिकदृष्ट्या थकत असून त्याच्या आयुष्यातील आनंद हरवत आहे. परिणामी त्यास विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी माणूस मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. माणसांनी स्वत:च्या मनाशी हितगुज करावी, यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ‘शोध आनंदी जीवनाचा’ ही कार्यशाळा घेण्यात येते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश ‘मानसिक आरोग्यविषयक जनजागृती’ करणे हा आहे.

वीडियो गॅलरी