समाजातील चालू घडामोडी, सामाजिक चळवळ आणि प्रबोधनात्मक गोष्टी या संदर्भातील माहिती समाजातील तरुण वर्गापर्यंत पोहचावी. आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी, तरुणांनी आपल्या देशाबद्दल, समाजाबद्दल, कायद्यांबद्दल जाणून घ्यावे.
आपण जीवन जगत असतांना आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक, राजकीय तसेच शासकीय, खाजगी, स्वयंसेवी संस्था, शाळा, विद्यालय, महाविद्यालय, लहान मुलांचे हक्क व अधिकार, पोलीस, सरकारी दवाखाने, न्यायालये, वेगवेगळे सरकारी कार्यालय, त्यांचे कामकाज व कार्यप्रणाली यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी आणि या प्रशिक्षणातून प्रामाणिक समाज कार्यकर्ता घडावा म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे विविध युवा विकास कार्यशाळा तसेच शिबिरे आयोजित करण्यात येतात.