यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने युथ वेलबिंग अंतर्गत “युवा नेतृत्व विकास कार्यशाळा” याचे आयोजन काल दिनांक २१ जुलै रोजी जिल्हा केंद्र नांदेड येथे करण्यात आले. नांदेड येथील १५ महाविद्यालयातून ३० युवांना या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेत स्वत:ला समजून घेणे, स्वत:च्या क्षमतांची जाणीव, सर्वांगीण विचार आणि त्याचे महत्व, गटकार्य आणि समाज यांसारख्या विविध विषयांवर सत्रे आयोजित करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा केंद्र नांदेड चे सचिव शिवाजी गावंडे, संदेश लाळगे, प्रा.संदीप देशमुख, जगन शेळके, शिवाजी अंबुलगेकर, निळोबा जाधव, माधव माधसावाड, संदीप देशमुख मनोहर बसवंते, ओमकार पाटील उपस्थित होते.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नांदेड