यशवंतराव चव्हाण सेंटर, आय.पी.एच ठाणे आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
मनतरंग - मानसिक आरोग्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ‘मैत्र’ या थीमवर आधारित हा चित्रपट महोत्सव असणार आहे.
या चित्रपट महोत्सवात दोन फिचर फिल्म्स देखील दाखविण्यात येतील. गणेश मतकरी व संतोष पाठारे या दोन चित्रपट अभ्यासकांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर या महोत्सवात प्रमुख संवादक म्हणून डॉ. आनंद नाडकर्णी उपस्थित राहतील.
या चित्रपट महोत्सवासाठी ३०० रुपये (दोन दिवसाकरिता) व २०० रुपये (एक दिवसकरिता) देणगी शुल्क आकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसाकरिता २०० रुपये देणगी शुल्क आकारली आहे. विद्यार्थ्यांनी सोबत येताना महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणावे. मानसिक आरोग्य प्रबोधानसाठीचा चित्रपट माध्यमाचा हा अनोखा आविष्कार पाहण्यास नक्की या.
दिनांक - ८ व ९ ऑक्टोबर | वेळ - स. १० ते सायं. ०६
स्थळ - रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर
जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
संपर्क :
भारती - ८२९१९८२५६८ , शैलेश - ८६५२४७३३३९, सुकेशनी - ८६५२११८९४९