यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दर शनिवारी ‘शेतकरी आठवडी बाजार’ भरवला जातो. सेंद्रिय शेतमालाला खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना तो थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा या उद्देशाने हा बाजार भरवण्यात येतो. 

राज्यभरातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आणि सेंद्रिय पदार्थ बनविणारे महिला गट यांच्यातर्फे फळे, भाजीपाला, धान्य, कडधान्य, प्रक्रिया उत्पादने, मध, तूप, मसाले यांसह विविध घरगुती उत्पादने यांचीही थेट विक्री याठिकाणी करण्यात येते.

या बाजारात केवळ प्रमाणित सेंद्रिय उत्पादनेच उपलब्ध करुन दिली जातात. त्यामुळे ग्राहकांना या बाजारात खात्रीशीर अशीच सेंद्रिय उत्पादने मिळतात.

श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी व ग्रोअर्स डायटेक्ट इंडिया लिमिटेड या संस्थांचे सहकार्य लाभते.

 

वीडियो गॅलरी