अदिती स्वामी

युवा क्रीडा पुरस्कार
2023

अदिती स्वामी यांनी वयाच्या १७ व्या वर्षी जागतिक चॅम्पियन म्हणून इतिहासात नाव कोरले आहे. सातारा येथील सरकारी शाळेतील गणिताच्या शिक्षिकेची मुलगी ते जागतिक तिरंदाज हा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. ज्योती सुरेखा वेन्नम आणि परनीत कौर यांच्यासमवेत महिला कंपाऊंड सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते. हे तिचे दुसरे सुवर्णपदक होते.

जिद्द आणि चिकाटीचे दुसरे नाव म्हणजे अदिती, असे म्हणायला काहीच हरकत नाही. क्रीडा प्रशिक्षण चांगले मिळावे म्हणून तिच्या वडिलांनी सातारा गाठले आणि आर्चरीचे ओळख करून दिली. तिथे एका उसाच्या शेतातील अकादमीत प्रशिक्षण चालू केले.

आर्थिक आव्हानांचा सामना करत अदितीच्या वडिलांनी तिच्या आवडीला महत्व दिले. खेळासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी, प्रवास खर्चासाठी तिच्या वडिलांनी कर्ज काढले. हेच कर्ज आता जगभरात नाव कमवून अदिती फेडत आहे, असे म्हणाले तरी हरकत नाही. तिला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.

अनेक गोष्टींचा त्याग करत, अनेक अडचणींना तोंड देत ती सध्या सक्षम पणे आपल्या खेळात नाव करत आहे, हे अभिमानास्पद !

अदिती स्वामी यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी

यशवंतराव चव्हाण डिजिटल मीडिया