अनिता माळगे

युवा उद्योजक पुरस्कार
2022

मूळच्या सोलापूरच्या असणाऱ्या सौ. अनिता माळगे यांनी गावातील महिलांना एकत्रित करून शेतकरी गटाची स्थापना केली आणि आपल्या शेती विषयक कार्याला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त १०० महिलांचे मिळून दहा गट होते परंतु मेहनतीच्या जीवावर त्यांनी आजच्या घडीला ४५ पेक्षा जास्त महिला गट तयार केले आहेत. सध्या १४०० पेक्षा जास्त महिला त्यांच्या कंपनी मध्ये काम करता आहेत.

या त्यांच्या कंपनी अंतर्गत सर्व प्रकारचे धान्य व त्यापासून तयार केलेले पदार्थ यांची विक्री केली जाते. तसेच लोणची, पापड, मसाले, शेवया यांचा देखील समावेश आहे. अनिता यांच्या कंपनीने "यशस्विनी" नावाचा एक ब्रँड तयार केला असून त्या ब्रँडअंतर्गत सर्व उत्पादनांची विक्री केली जाते.

यशस्विनी अँग्रो प्रोड्युसर शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत मालाला शहरातील अनेक मॉलमध्ये मागणी आहे. कंपनीचा विस्तार वाढत असताना कोनावरच जास्त लोड येणार नाही, ही काळजी अनिता माळगे स्वतः घेतात. त्यांच्या कामाची प्रशंसा म्हणून त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

गेल्या वर्षी देशाच्या पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये अनिता माळगे यांचे पंतप्रधानांनी स्वतः कौतुक केले.

त्यांच्या कार्याची व्याप्ती अशीच वृध्दींगत होत राहो, या सदिच्छा...!

यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी

यशवंतराव चव्हाण डिजिटल मीडिया