हेमलता पडवी
सामाजिक पुरस्कार
2022
मुळच्या वडजाखण, नंदूरबार येथील असणाऱ्या हेमलता पाडवी यांनी “हेंगात्या” या संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावात सामाजिक कार्याला सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गावातील आदिवासी महिलांना जोडले आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम चालू झाले. कोरोना काळात गावातील गरजूंना धान्य वाटपाचे काम कोरो संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केले. कोरो या संस्थेची त्यांना फेलोशिप मिळाली आणि त्यातूनच त्यांचा नेतृत्व विकास होत गेला. गावतील ६० कुटुंबाना रोजगार हमी योजनेतून त्यांनी काम मिळवून दिले.
हेमलता यांची गावातील वाढती लोकप्रियता काही प्रतिष्ठित लोकांना आवडत नव्हती. त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी गावासाठी जीवाचे रान केले. गावकर्यांनी त्यांना डोक्यावर घेतले आणि गावचे सरपंच केले. त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर प्रथम गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर कार्यालय सुरळीत चालू ठेवले.
गावातील हरेक महिला शिकली पाहिजे, गावातील महिलांनी शिक्षण घेऊन आमदार, खासदार झाले पाहिजे, हे स्वप्न हेमलता पाडवी यांनी पाहिले आहे आणि त्यासाठी ते कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याची उंची अशीच वाढत राहो, या सदिच्छा…!
यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.