अमृता देसर्डां

साहित्य युवा पुरस्कार
2022

पुण्याच्या आय.एल.एस. या विधी महाविद्यालयातून कायद्याचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर अमृता देसर्डा यांनी मुंबई विद्यापीठातून एल.एल.एम केले. कायदा आणि लेखन क्षेत्रात त्यांचा दहा वर्षांचा अनुभव आहे.

जून २०१५ साली “सारद मजकूर” या संस्थेची स्थापना अमृता यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून लेखन, शब्दांकन आणि संपादन या क्षेत्रात अमृता कार्यरत आहेत. या संस्थेचे काम मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत चालू असते. “शब्दालाही असतेच आयुष्य थोडंथोडंक नाही तर माणसाच्या आयुष्याच्या पलीकडही टिकून राहतो तो त्याचा शब्दच…” या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली आहे.

दैनिक सकाळ, दैनिक प्रभात, दिव्य मराठी, सकाळ साप्ताहिक, तनिष्का, लोकप्रभा या अशा मध्यामसमूहातून अमृता यांचे लेख, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

अमृता देसर्डा यांच्या “आत आत आत” या काव्यसंग्रहाला खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासाला खूप सदिच्छा !

अमृता देसर्डा यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य युवा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी

यशवंतराव चव्हाण डिजिटल मीडिया