यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने नव्या पिढीला वारकरी संगीताचा परिचय करून देण्यासाठी ' संतविचारांचा सुरेल आविष्कार ' हा रिंगण भजन सोहळा रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

गंगाखेड, परभणी येथील ज्येष्ठ गायिका हभप गोदावरीताई मुंडे या सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. या ‘रिंगण भजन सोहळ्यास’ मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

हा कार्यक्रम अविस्मरा सेलिब्रेशन्स, अतुल नगर, वारजे, चितळे बंधू मिठाईवाले शेजारी, पुणे येथे पार पडणार आहे.