मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याबद्दल समाजात अजूनही जागरूकता नाही. मानसिक आरोग्याबद्दल फारस बोललं जात नाही. त्याचे महत्त्व मानले जात नाही. त्यामुळे महिलांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा आमचा हेतू आहे.
महिलांना रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना मानसिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. ज्या महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागते, त्या महिलांना मानसिक आधाराची आणि समुपदेशनाची अत्यंत गरज असते. यासाठी चव्हाण सेंटरतर्फे गट समुपदेशनाच्या कार्यशाळा घेतल्या जातील. ज्यांच्या वर अत्याचार होतात त्याचप्रमाणे जे अत्याचार करतात त्यांनाही समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे त्यांच्यासाठी गट समुपदेशनाच्या कार्यशाळा चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित केल्या जातील.