भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात यावे असा निर्णय केंद्र शासनाने २००८ मध्ये घेतला. यानुसार राष्ट्रीय शिक्षण दिनाचे आयोजन करणारी यशवंतराव चव्हाण सेंटर ही देशातील पहिली संस्था आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी राष्ट्रीय परिषदा घेतल्या जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये प्रत्यक्षात शिक्षण परिषद घेणे शक्य झाले नाही. तथापि ऑंनलाइन पद्धतीने ‘देशोदेशीचे शिक्षण’ आणि इतर विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच ‘१०० दिवसात १० वी’ या दहाव्या शिक्षण परिषदेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचने आजपर्यंत विविध विषयांवर तेरा वार्षिक शिक्षण परिषदा आयोजित केल्या आहेत.
क्रमांक | वर्ष | परिषदांचे विषय |
---|---|---|
१. | २००८ | सर्वांगीण गुणवत्ता कार्यक्रम |
२. | २००९ | शिक्षण हक्क कायदा, २००९ |
३. | २०१० | शाळांची परिणामकारकता |
४. | २०११ | शालेय अभ्यासक्रमात उत्पादक कौशल्य विकास |
५. | २०१२ | शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्तनसंहिता |
६. | २०१३ | शालेय शिक्षणात माहिती व तंत्रज्ञान |
७. | २०१४ | सरकारी आणि अनुदानित शाळांपुढील आव्हाने |
८. | २०१५ | शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता |
९. | २०१७ | सेमी- इंग्रजी : काल आज आणि उद्या |
१०. | २०१८ | शालेय शिक्षण : आज आणि उद्या |
११. | २०१९ | शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती |
१२. | २०२२ | द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण |
१३. | २०२२ | नवीन शैक्षणिक धोरण २०२०: अंमलबजावणी |