राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये तसेच सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या नामवंत व्यक्तीला 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात येतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र व पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सुयोग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमधील सदस्य:
- १. मा. डॉ. रुपा शहा, माजी कुलगुरु, एन.एन.डी.टी विद्यापीठ
- २. मा. डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी महानिदेशक वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद
- ३. मा. डॉ. सुहास पेडणेकर
- ४. मा. डॉ. नरेंद्र जाधव, सदस्य, योजना आयोग
- ५. मा. श्री. इफ्तीखर एम् कद्री
- ६. मा. डॉ. विवेक सावंत