नवी मुंबई, दि. ३ डिसेंबर (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हा केंद्र नवी मुंबई यांच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी "करिअर गाईडन्स" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रा.डॉ. संदीप नेमळेकर हे या कार्यशाळेचे मार्गदर्शक होते. या कार्यशाळेस जवळपास ३०० मुला- मुलींची उपस्थिती होती.

याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले, जिल्हा केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड तसेच स्टर्लिंग कॉलेजचे सर्व प्राध्यापक व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.