यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित राष्ट्रीय युवा धोरण २०२१ सुधारित मसुदा चर्चासत्रातील मत

औरंगाबाद, दि. १८ (प्रतिनिधी) - ग्रामीण तसेच मागास विभागातील युवकांसाठी विशेष युवा योजना, युवक कल्याण विद्यापीठ, शेतीपूरक अभ्यासक्रम, करीअर कौऊंसेलिंग आणि त्यासाठी आर्थिक तरतूद असावी असे मुद्दे औरंगाबाद येथील युवकांनी मांडले. यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय युवा धोरण २०२१ सुधारित मसुदा' विषयावरील या चर्चासत्रात या भागातील युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

या चर्चासत्रास शिक्षण, रोजगार, व्यवसाय, आरोग्य, क्रीडा, सायबर गुन्हे आणि सामाजिक न्याय या विषयांवर युवकांनी काही लक्षणीय बदल सूचविले. औरंगाबादसह जालना, बुलढाणा, नांदेड जिल्हा केंद्रातील युवक, एम. जी. एम. महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेमधील युवक व युवतींचा यावेळी मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

सर्व सहभागी युवांना प्रा. डॉ रेखा शेळके, रेणुका कड, प्रा. युसुफ बेन्नूरे आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चर्चासत्राच्या आयोजनासाठी सुबोध जाधव, गणेश घुले, रणजीत बायस, ऋषी डोनगावकर, सचिन निकम,अभिजीत हिरप, ऋषिकेश खंडाळे आदींनी परिश्रम घेतले.

पुढील विभागीय चर्चासत्र उद्या दि. १९ मे २०२२ रोजी नागपुर येथे होणार आहे. या चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
संतोष मेकाले -९८६०७४०५६९
( यशवंतराव चव्हाण सेंटर )