मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिजनल रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटरच्या अंतर्गत सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने “पिढी-पिढीतील स्नेहबंध मेळा” (Intergenerational Bonding Mela) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या समाजात एकत्र कुटुंबपद्धती मुळे एकमेकांत सुसंवाद होता, आत्मीयता होती. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या पिढ्या एकमेकांपासून दुरावत चालल्या आहेत, असे चित्र समाजात पाहायला मिळत आहे. हा पिढ्यांमधला संवाद हरवू नये, या जाणिवेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. विनोदिनी प्रधान, मनीषा कोटक, डॉ. रेखा भातखंडे, डॉ. अविनाश फाटक, डॉ. रमेश पोतदार, जी.जी. पारेख या सहा ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ग्रंथ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

स्वामी विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांनी ऑर्केस्ट्रा सादर केला. अजय पानवलकर या अंध मुलाने बासरी वादन केले. ज्येष्ठ नागरिक व युवांचा या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी मा.अ‍ॅड. निर्मलाताई सामंत, चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले, सीईओ दिप्ती नाखले, दत्ता बाळसराफ, दिपिका शेरखाने, संतोष मेकाले, राज्याच्या फेसकोम संस्थेचे अध्यक्ष अरुण रोडे, अण्णासाहेब टेकाळे, मा. डिचोलकर, मा.औंधे आदी मान्यवर उपस्थित होते.