यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ‘गावरान दिवाळी महोत्सव २०२२’ आयोजित करण्यात आला आहे. त्याचा उद्घाटन सोहळा काल दिनांक १४ ऑक्टोबर रोजी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष मा.सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते पार पडला.

याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अंकुश अण्णा काकडे, प्रशांत जगताप, राजलक्ष्मी भोसले, विशाल तांबे, मृणालिनी वाणी, भारती शेवाळे, लोचन शिवले, वासंती काकडे, अश्विनी भागवत, विजया ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या चार दिवसीय दिवाळी महोत्सवात महिला बचत गट निर्मित फराळ तसेच दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. हा दिवाळी महोत्सव नागरिकांसाठी दिनांक १७ ऑक्टोबर पर्यंत खुला राहील.

या दिवाळी महोत्सवास नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी.
स्थळ - लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी पोस्ट ऑफीस जवळ, धनकवडी, पुणे - ४११०४३