आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
शेती क्षेत्रासाठी 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर', साहित्य क्षेत्रासाठी 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन लिटरेचर' तर शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांसाठी 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन' सुरू करण्यात आली आहे.
आयुष्यात आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.