यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मुंबई मॅनिफेस्टोची सुरवात करण्यात आली. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांवर या podcast च्या माध्यमातून विविध मान्यवरांशी चर्चा केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये शिक्षण, पर्यावरणविषयक चिंता, सार्वजनिक वाहतूक आणि शहरी नियोजन यासह विविध विषयांचा समावेश आहे. मुंबई मॅनिफेस्टो अंतर्गत शहराच्या भविष्याची कल्पना करताना, पायाभूत सुविधा आणि सेवांचे व्यवस्थापन करताना नागरिक आणि सरकार या दोघांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा अभ्यास केला जाणार आहे.
The Yashwantrao Chavan Centre proudly presents the Mumbai Manifesto. This series features insightful discussions with leading experts on key issues impacting the daily lives of Mumbaikars. Covering a range of topics—from education and environmental concerns to public transportation and urban planning—the Mumbai Manifesto explores the challenges faced by both citizens and government in managing infrastructure and services, while envisioning the city's future.