यशवंतराव चव्हाण सेंटरच्या, संशोधन केंद्रातर्फे जेएनयूच्या रशिया आणि मध्य आशियाई अभ्यास केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिताभ सिंग यांचे ' रशिया-युक्रेन कन्फ्लिक्ट, रिशेपिंग ऑफ
द वर्ल्ड ऑर्डर ' या विषयावर नेहरू सेंटर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. अभिताभ सिंग यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व शंकांचे निरसन केले.
याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे, प्रा.डॉ. मृदुल निळे, पोलंडचे कौन्सिल जनरल यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले तर पूर्वा वळसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने केले होते.