यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिपांकर सिन्हा यांचे ‘रिबूटिंग पॉलिटीकल कम्युनिकेशन’ या विषयावर नेहरू सेंटर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. सुरेंद्र जोंधळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिपांकर सिन्हा यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व प्रश्नांचे निरसन केले.
याप्रसंगी दर्शना दामले, निर्मला सामंत, दत्ता बाळसराफ आदि मान्यवर उपस्थित होते. चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले तर प्रा. मृदुल निळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने केले होते.