यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कोलकता येथील जादवपूर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. शिबाशिष चॅटर्जी यांचे ' पॉवर अँड ग्लोबल गव्हर्नन्स : इंडियाज रोल इन द जी२० इन टर्बुलन्ट टाईम्स ' या विषयावर व्याख्यान नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ विचारवंत व उद्योजक जयराज साळगावकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. शिबाशिष चॅटर्जी यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व प्रश्नांचे निरसन केले.
याप्रसंगी तुर्कीचे कौन्सिल जनरल, प्रा.डॉ. मृदुल निळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले तर पूर्वा वळसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने केले होते.