यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने डॉ. समीर पाटील यांचे ‘इंडियाज सायबर सिक्युरिटी चॅलेंजेस’ या विषयावर व्याख्यान नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. डॉ. सचिन पारधे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. समीर पाटील यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व प्रश्नांचे निरसन केले.
याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अदिती नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले तर पूर्वा वळसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने केले होते.