महाराष्ट्रातील महिलांचा सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि राजकीय विकास होण्यासाठी ‘यशस्विनी सामाजिक अभियान’ कार्य करत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील हजारो स्त्रियांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांना या अभियानाचा लाभ झाला आहे.
अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना आणि वैयक्तिक पातळीवरती प्राथमिक आर्थिक मदत देऊन स्वतःचे लघु उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आर्थिक सक्षमतेसाठी शेतीपूरक व्यवसाय, किराणामाल आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान, विविध पीठाची गिरणी व तिखटाचे डंक, घरगुती मसाले इ.चा समावेश होतो.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आणि उमेद यांच्या वतीने महिलांना कृषी विषयक, सुक्ष्म अन्न प्रक्रियाविषयक, तसेच महिला पूरक योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा,व्याख्याने आयोजित केले जातात.