आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक पुरस्कार दिला जातो.
- १. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, समाजरचना / व्यवस्थापन प्रशासन पारितोषिक
- २. यशवंतराव चव्हाण सामाजिक एकात्मता / विज्ञान-तंत्रज्ञान पारितोषिक
- ३. यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास / आर्थिक-सामाजिक विकास पारितोषिक
- ४. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संस्कृती/कला व क्रीडा पारितोषिक
महाराष्ट्रात दरवर्षी वरील क्षेत्रात असाधारण व भरीव कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुरस्कार देण्याचा निर्णय चव्हाण सेंटरने घेतला आहे. सन्मानपत्र व दोन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.