कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम म्हणजे प्रीतिसंगम. हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आयुष्यातील विरंगुळ्याचे स्थळ होते. या परिसरात वेगवेगळी देवालये आहेत. जवळून आणि दुरूनही हा संगम खूप मनमोहक दिसतो.
प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. चांगल्या कार्याची सुरुवात करायची असेल तर इथे येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले जाते.
महाराष्ट्राच्या समाजकारणातील तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रीतिसंगमाकडे पाहिले जाते.