यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने रजनी बक्षी यांचे ‘बाझार इथोस अँड द डिफायंट सर्च फॉर अल्टरनेटिव्ह टू कॅपिटॅलिझम’ या विषयावर व्याख्यान नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. प्रा. आर. रामाकुमार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रजनी बक्षी यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व प्रश्नांचे निरसन केले.
याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले तर पूर्वा वळसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने केले होते.