यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने डॉ. मुमिन चेन यांचे ‘व्हाय तैवान शुड बी इंडीयाज फ्रेंड : डेव्हलपमेंट ऑफ तैवान- इंडीया रिलेशन्स’ या विषयावर व्याख्यान नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. मुमिन चेन यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व प्रश्नांचे निरसन केले.

चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले तर पूर्वा वळसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने केले होते.

वीडियो गॅलरी