यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने डॉ. परिमल माया सुधाकर यांचे ‘इंडियाज ॲस्पिरेशनल फॉरेन पॉलिसी’ या विषयावर व्याख्यान नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. डॉ. हर्षद भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. परिमल माया सुधाकर यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व प्रश्नांचे निरसन केले.

याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, प्रा.डॉ. मृदुल निळे, शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. चव्हाण सेंटरच्या सी.ई.ओ. दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले तर पूर्वा वळसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन शिक्षण विभागाने केले होते.

वीडियो गॅलरी