यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने पी. साईनाथ यांचे ‘गव्हर्नन्स बाय गॅगिंग अँड द वलरायझेशन ऑफ इनएक्वेअलिटी’ या विषयावर नेहरू सेंटर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. उमेश बागडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
मुंबई डायलॉग ऑन वर्ल्ड अफेअर्स या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पी. साईनाथ यांनी अतिशय उत्तम रीतीने या विषयावर मार्गदर्शन करून सर्व प्रश्नांचे निरसन केले.
चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने केले होते.