देशभरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आरोग्य सेवेचे सुलभीकरण आणि लोकशाहीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. अभय बंग यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना प्रदान करण्यात आला. ५ लाख रुपये, मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार स्वीकारताना डॉ. बंग यांनी कृतज्ञता व्यक्त करत, गडचिरोलीतील औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आदिवासींचे रोजगार, शिक्षण व मूलभूत प्रश्न यावर सकारात्मक चिंतन होण्याची गरज व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात शरद पवार यांनी बंग दाम्पत्याच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी कार्याचा गौरव करत, ही निवड अतिशय सार्थ असल्याचे नमूद केले. डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने बंग दाम्पत्याच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी अरुण गुजराथी, हेमंत टकले, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
12 मार्च 2025