यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा महिलांना खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'यशस्विनी पुरस्कार' प्रदान करण्यात आले. यामध्ये डाॅ. श्यामल गरुड (साहित्य), मनिषा सजनपवार (कृषी), उल्काताई महाजन (सामाजिक), अलका धुपकर (पत्रकारिता), कमल कुंभार (उद्योजकता) आणि डाॅ. शबनम शेख (क्रीडा प्रशिक्षक) यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व ₹२५,००० रोख देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना खासदार शरद पवार यांनी महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा प्रवास मांडत पुरुषी मानसिकता बदलण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृतीची गरज व्यक्त करत राज्यव्यापी अभियानाची माहिती दिली. प्राजक्त देशमुख आणि आसावरी जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




