पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित 'यशस्विनी सन्मान' सोहळ्यात विविध क्षेत्रांतील सहा कर्तृत्ववान महिलांना खासदार शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. "कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरुषांकडे नसून संधी मिळाल्यास महिला मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश नक्कीच खेचून आणतात," असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला; तसेच महाराष्ट्राचे महिला धोरण देशासाठी मार्गदर्शक ठरल्याचा अभिमानही त्यांनी नमूद केला. या सोहळ्यात मीनाक्षी पाटील (साहित्य), कलावती सवंडकर (कृषी), संध्या नरे-पवार (पत्रकारिता), रुक्मिणी नागापुरे (सामाजिक), राजश्री गागरे (उद्योजकता) आणि श्रद्धा नलमवार (क्रीडा प्रशिक्षक) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच महिला धोरणाचा आढावा घेणाऱ्या 'धोरण कुठवर आलं गं बाई' या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. महिला दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता महिलांना वर्षभर सन्मानाची वागणूक मिळावी, तसेच त्यांनी डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत डीपफेकसारख्या धोक्यांबाबत सजग राहावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले; तर प्रगती करू इच्छिणाऱ्या स्त्रियांच्या पाठीशी समाज आणि कुटुंबाने खंबीरपणे उभे राहण्याची गरज प्रमुख पाहुण्या पद्मश्री अनू आगा यांनी प्रतिपादित केली.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
22 जून 2024