भारतीय पत्रकारिता दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे मुंबईत राज्यस्तरीय महिला पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकारांना केवळ 'महिला' या चौकटीत न अडकता स्वतःची ओळख एक सक्षम पत्रकार म्हणून निर्माण करण्याचे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणासाठी विशाखा समितीचे वास्तव तपासण्याचे आवाहन केले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचा गौरव करण्यात आला, तर प्रमुख पाहुण्या कल्पना शर्मा यांनी पत्रकारितेतील बदलत्या स्वरूपावर परखड भाष्य केले.

दिवसभरात पार पडलेल्या विविध चर्चासत्रांमध्ये संरक्षण आणि ग्राउंड रिपोर्टिंगमधील आव्हाने, मराठी पत्रकारितेतील वरिष्ठ पदांवरील महिलांचे प्रमाण, तसेच कामाच्या ठिकाणची सुरक्षितता यावर अनुभवी पत्रकारांनी विचार मांडले. यासोबतच पत्रकारितेत एआयचा (AI) सुरक्षित वापर, फेक न्यूज रोखण्यासाठी माध्यम शिक्षणाची गरज आणि न्यूजरूममधील कामाचा ताण या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले. एमजीएम विद्यापीठाचे कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड मीडिया, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्हीजे यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या संमेलनात राज्यभरातील महिला पत्रकार आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
16 नोव्हेंबर 2025