ठाणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र ठाणे आणि बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'यशवंत व्याख्यान माला' या कार्यक्रमांर्गत हितगुज नव्या वैज्ञानिक पिढिशी या विषयावर व्याख्यान सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ वैज्ञानिक-डॉ. बाळ फोंडके हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे एक द्रष्टे व्यक्तीमत्व होते. ज्ञान, विज्ञान, संशोधन, कला, साहित्य, शिक्षण, क्रिडा, सामाजिक सुधारणा या प्रत्येक घटकाबाबत त्यांना विलक्षण आस्था होती. भावी समाजाच्या उभारणीसाठी, तरुण पिढीकडून त्यांना विशेष अपेक्षा होत्या. या दृष्टीकोनातून यशवंतराव प्रतिष्ठान. ठाणे जिल्हा केंद्राने मागील वर्षापासून 'यशवंत व्याख्यान माला' सुरू केली आहे. हा कार्यक्रम बा.ना.बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथे होणार असून विभागीय केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले आणि बा.ना.बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर या अधिक लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.