ठाणे विभागीय केंद्र : ३० सप्टेंबर २०१६ रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील सहयोग मंदिराच्या दुस-या मजल्यावरच्या सभागृहात सुप्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे जोशी व श्री. निलेश निरगुडकर यांच्या संगिताचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात श्रीनिवास खळे, श्रीधर फडके, यशवंत देव यासारख्या जुन्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना मनमुराद निमूल्य लुटण्याची सुवर्णसंधी लाभली. यावेळी ठाणे शहरातील ६ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यात ज्येष्ठ उद्योजक श्री. मदन देशपांडे, घरोघरी जाऊन रुग्णांची सेव करत असताना रोटरीच्या पोलिओ मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरविंद भडकमकर, शैक्षणिक क्षेत्रात झोकून दिलेल्या आणि राबोटी तसेत घोडबंदर येथील प्रतिथयश सरस्वती विद्यालयाच्या सर्वेसर्वो सौ. मीरा कोर्डे, ई. एन. टी. मध्ये सर्जन असलेले जे. जे. रुग्णालयाचे माजी प्रमुख ज्यांनी अनेक निपुण डॉक्टर घडवलेत असे डॉ. भागवत चौधरी, कै. सुधीर फडके यांचे शिष्य ज्यांनी ४१६१ गीतरामायणाचे कार्यक्रम करुन समाजाला रिझवले आहे असे श्री. चंद्रकांत चव्हाण, ज्यांनी श्वास या चित्रपटाची कथा लिहून मराठी चित्रपटाला ऑस्कर पर्यंत नेऊन पोचविले आणि ज्यांच्या साहित्याने उभ्या महाराष्ट्राला वाचनाची गोडी लावली अशा सौ. माधवी घारपुरे या सर्वांचा यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र तसेच स्मृतीचिन्ह कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जी.बी. पिंगुळकर यांच्या हस्ते प्रदान करुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे माजी नगर विकास विभागाचे सचिव श्री. जी. बी. पिगुळकर, आय.ए.एस लाभले होते. त्यांच्या हस्ते वरील सहा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.